Pune Pimpri Crime | व्हिडिओला लाईक करणं पडलं महागात, हिंजवडीत एकाची 12 लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | व्हिडिओला लाईक केल्यानंतर 50 रुपये रिफंड मिळतात असे सांगून 16 वेळा रिफंड म्हणून नऊ हजार रुपये दिले. या टास्कमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला रिफंड आणि बोनस मिळेल असे आमिष दाखवून एकाला तब्बल 12 लाख 23 हजार 500 रुपयांना गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 14 आणि 15 जानेवारी रोजी हिंजवडी येथे घडला आहे.

 

याबाबत रवी शंकर सोनकुशरे Ravi Shankar Sonkushere (वय-43 रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या व्हॉट्सअपवर एक लिंक आली होती.
त्या लिंकवर फिर्यादी यांनी रजिस्ट्रेशन केले होते. त्यानंतर फिर्य़ादी यांना व्हिडिओ पाठवण्यात आले.
फिर्यादीने व्हिडिओला लाईक (Video Like) केला असता त्यांना रिफंड म्हणून 50 रुपये मिळाले.
त्यांना 16 वेळा रिफंड मिळाले. त्यामुळे फिर्य़ादीने या टास्कमध्ये 12 लाख 23 हजार 500 रुपये गुंतवले.
यानंतर फर्यादी यांनी रिफंड आणि बोनसबाबत विचारले.
परंतु आरोपीने टेलीग्रामवरील ग्रुपच डिलीट करुन बंद करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | It was expensive to like the video, a fraud of 12 lakhs by one in Hinjewadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार

Nashik Graduate Constituency | आमदार कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

Pune Crime News | गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात असणारे मंगलदास बांदल 21 महिन्यानंतर बाहेर येणार, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर