Pune Pimpri Crime | अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, निगडी परिसरातील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलीचे (Minor Girl) अपहरण (Kidnapping) करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 13 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रावेत येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-41) रविवारी (दि.20) निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद विजय मिस्त्री Vinod Vijay Mistry (रा. सोलापूर) याच्यावर IPC 363,
376 (2) (जे), 376 (2) (एन), 506 सह लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत
(POCSO Act ) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करुन तिला लग्न करण्याचे आमिष (Marriage Lure) दाखवून तिचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने मुलीला त्याच्या मित्राच्या रुमवर नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तिने याला विरोध केला असता आरोपीने मुलीला तिचे अश्लील फोटो (Obscene Photos) व्हायरल करण्याची
धमकी (Threat) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमासे (PSI Omase) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Kidnapping and sexually assaulting a minor girl, a shocking incident in Nigdi area