Pune Pimpri Crime | नोकरीच्या शोधात असलेल्याची पिंपरीत चिठ्ठी लिहून आत्महत्या, चिठ्ठीत म्हटले…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्यूनंतर दु:ख व्यक्त करायला मला जवळचं कोणीच नाही असा मजकूर लिहून एकाने केजुदेवी (Kejudevi) बंधाऱ्यात आत्महत्या (Committed Suicide) केली. हा प्रकार शुक्रवारी (दि.9) सकाळी थेरगाव येथे उघडकीस आला. सुरेश कुमार Suresh Kumar (रा. केरळ – Kerala) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) नोंद करण्यात आली असून सुरेशने आत्महत्या केली की यामागे घातपात आहे, याचा तपास पोलीस (Pune Pimpri Crime) करीत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी थेरगाव (Thergaon) येथील केजुदेवी बंधाऱ्यात मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी (Suicide Note) सापडली आहे. यामध्ये मी शहरात नोकरीच्या (Job) शोधात आलो होतो. मात्र, मला काम मिळाले नाही. माझ्या खिशात पैसे आणि खाण्यासाठी अन्न नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. (Pune Pimpri Crime)

 

माझा मृतदेह खड्ड्यात फेका, कारण मृत्यूनंतर दु:ख व्यक्त करायला मला जवळचं असं कोणीच नाही, असे चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. परंतु ही चिठ्ठी सुरेश यानेच लिहिली आहे का ? तसेच यामागे काही घातपात आहे ? याचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा