Pune Pimpri Crime | मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देण्याच्या बहाण्याने दिले गुंगीचे औषध, महिला बेशुद्ध झाल्यावर…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मूल होण्यासाठी महिलेला आयुर्वेदिक गोळ्या (Ayurvedic Pills ) देण्याच्या नावाखाली गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. तसेच त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी (Threat) देऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 10 फेब्रुवारी 2021 ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत भोसरी, शिरुर येथे (Pune Pimpri Crime) घडला आहे.

 

याबाबत 25 वर्षीय पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. राजू नानाभाऊ गुलदगड Raju Nanabhau Guldgad (वय-50 रा. चाकण) याच्या विरोधात आयपीसी 328, 376, 376 (2)(एन) (आय),506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चाकण येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या असताना त्यांची आरोपीशी ओळख झाली. (Pune Pimpri Crime)

 

आरोपीने फिर्यादी यांना मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देऊन 90 हजार रुपये घेतले. फेब्रुवारी 2022 मध्ये आरोपी फिर्यादी यांच्या घरी आला.
मूल होण्यासाठी त्याने गोळ्या आणल्या असल्याचे सांगितले. त्याच्याकडील गुंगीची गोळी पीडित महिलेला दिली.
गोळी खाल्ल्यानंतर महिलेला गुंगी आली असता आरोपीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.

फिर्यादी यांचे नग्नावस्थेत फोटो (Nude Photos) काढले. फिर्यादी यांना शुद्ध आल्यानंतर आरोपीने त्यांना ते फोटो दाखवले.
घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादीला वेळोवेळी त्यांच्या घरी आणि शिरुर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार (PSI Govind Pawar) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | medicine was given on the pretext of giving Ayurvedic pills for childbirth, after the woman fainted…

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेसमोरील पेच आणखी वाढला

 

Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?

 

New Labour Code 2022 | नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी लवकर? Modi Government ’या’ महिन्यापासून लागू करणार आठवड्यातील 3 दिवस सुट्टीचा नियम