Pune Pimpri Crime | कचरा टाकण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय महिलेचा विनयभंग, एकावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कचरा (Garbage) टाकण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याप्रकरणी एकावर देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehu Road Police Station) रावेत पोलीस चौकीत (Ravet Police Chowki) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. विशाल आप्पा कदम (Vishal Appa Kadam) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी विशाल कदम याच्यावर IPC 354, 323, 427, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) केला आहे.
याबाबत 19 वर्षाच्या विवाहित महिलेने रावेत पोलीस चौकीत रविवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.21) रात्री साडेदहाच्या सुमारास रमाबाईनगर रावेत (Ramabainagar Ravet) येथे घडला आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कचरा टाकण्यासाठी गेली असता आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांना जोरात ठकलले. त्या खाली पडल्यानंतर त्यांचे तोंड दाबले. यामध्ये फिर्यादी यांचे मंगळसूत्र तुटले. तसेच अंगावरील कुर्ता फाटून फिर्यादी यांच्या मनास लज्जा होईल, असे वर्तन आरोपीने केले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने त्यांना मारहाण (Beating) केली. तसेच शिवीगाळ करुन धमकी (Threat) दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.ए. गायकवाड (PSI S.A. Gaikwad) करीत आहेत.
Web Title : Pune Pimpri Crime | Molestation of a 19-year-old woman who went to dump garbage, FIR on one
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर