Pune Pimpri Crime | स्कूल बसमध्ये मोठ्याने गाणी लावून विद्यार्थिनींचा विनयभंग; चालकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | स्कूल बसमध्ये मोठ्याने गाणी लावून तसेच स्कूल बस (School Bus) बंद पडली असताना दोन विद्यार्थिंना बसमधून उतरू न देता त्यांच्यासोबत गैरवर्तन करून स्कूल बसचालकाने विनयभंग (Molestation) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. ही घटना मागील सहा महिन्यांपासून ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) पोलिसांनी बसचालकाला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.

 

याबाबत पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिंकू कुमार Pinku Kumar (वय 30) याच्यावर आयपीसी 354, 279, पॉक्सो अॅक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि तिची मैत्रीण स्कूल बसमधून घरी जात असताना आरोपी रोज गाडीमध्ये मोठ्याने गाणी लावत होता.
तसेच त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघत होता. पीडित मुलीने गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितला.
मात्र, आरोपीने तुम्हाला काय करायचे ते करा मी मोठ्याने गाणी लावणार, असे म्हणत फिर्यादीकडे बघून गाणी म्हणू लागला.

फिर्य़ादीच्या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने मोबाइलवर बोलत असताना मोबाइल रागाने स्कूल बसबाहेर फेकून देत बस जोराने चालवली.
काही अंतरावर बस बंद पडल्याने बसमधील मुले खाली उतरली.
परंतु आरोपीने फिर्य़ादी आणि तिच्या मैत्रिणीला बसमधून उतरू दिले नाही.
तसेच फिर्यादी आणि तिच्या मैत्रिणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कादबाने करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | molestation of female students by playing loud songs in school bus; The driver was arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम