Pune Pimpri Crime | पेट्रोलपंपचालकाची तब्बल 21 लाखांची फसवणूक, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पेट्रोलपंपावर (Petrol Pump) कामावर असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाकडून स्वत:च्या फोन पेद्वारे पैसे स्वीकारुन पेट्रोलपंपचालकाची 21 लाख 50 हजार रुपयांची फसणवूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 1 ऑगस्ट 2022 ते 8 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथील पेट्रोल पंपावर घडला.

 

याबाबत बुधवारी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार पोलिसांनी वैभव बाळासो जाधव (रा. दिघी), रोहीत विजय माने (रा. सदगुरु नगर भोसरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे लक्ष्मी एनर्जी अॅण्ड फ्यूल पंपावर (Lakshmi Energy and Fuel Pump) काम करीत होते.
त्यांनी संगनमत करुन पेट्रोलपंपचालकाची कोणतीही परवानगी न घेता स्वत:च्या फायद्याकरिता ग्रहाकांकडून येणार पैसे स्वत:च्या फोन पे वर क्युआर कोडद्वारे घेतले.
आरोपींनी तब्बल 21 लाख 50 हजार रुपये स्वीकारुन फिर्य़ादी यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | money taken from customers on their own phone pay 21 lakh fraud of petrol pump operator

   

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | परदेशात व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून पुण्यातील व्यावसायिकाला 37 लाखांना गंडा

Pathaan Controversy | दीपिका पदुकोणचा जुना व्हिडीओ व्हायरल; ” रंगाने धर्म निवडला नाही……”

Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन