Pune Pimpri Crime | महिलेला लघवी पाजण्याच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने लघवी पाजण्याचा प्रयत्न (Trying Drink Urine) केल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) दाखल करण्यात आली आहे. मात्र, आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. फिर्यादी महिलेने आपण रागाच्या भरात अशी तक्रार दाखल केल्याचा लेखी जबाब पोलिसांना दिला आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी 4 महिलांसह 8 जणांवर गुन्हा (FIR) दाखल (Pune Pimpri Crime) केला आहे.

 

काय आहे प्रकरण?
महिलेच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्यानंतर संबंधित महिला सासऱ्यासोबत (Father in Law) जाब विचारण्यासाठी गेली होती. आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब तिने विचारला. त्यावेळी आरोपींनी महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्या, चपला आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर आरोपींनी बाटलीत लघवी गोळा करुन आपल्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला आणि सासऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.(Pune Pimpri Crime)

हा प्रकार 15 मे रोजी सूसगाव (Susgaon) या ठिकाणी घडला होता. घडलेल्या प्रकारामुळे महिला आणि तिचे सासरे तणावात होते.
या धक्क्यातून सावरत महिलेने 21 मे रोजी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसह आठ जणांवर विनयभंग (Molestation Case) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे (API Ganesh Kharge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | new shocking information in the case of a woman trying to urinate in susgaon pimpri chinchwad of pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Megha Kirit Somaiya | मेघा सोमय्या यांच्याकडून संजय राऊतांवर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; जाणून घ्या प्रकरण

 

Coconut Water Benefits | नारळ पाणी आरोग्यासोबतच वजन कमी करण्यासाठी फायद्याचं, जाणून घ्या

 

Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या