Pune Pimpri Crime News | तडीपार गुन्हेगारासह दोघांना अटक, गुन्हे शाखेकडून 2 पिस्टल व काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या (PCPC Police) हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार (Tadipaar) केले असताना कोणत्याही परवानगी शिवाय शहरात वावरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) अटक केली आहे. पोलिसांनी तडीपार गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करुन दोन पिस्टल (Pistol) व दोन जीवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.2) रात्री पावणे आठच्या सुमारास मेदनकरवाडी येथे करण्यात आली. (Pune Pimpri Crime News)

अतुल हरिश्चंद्र तोत्रे (वय-27 रा. मोशी, सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण), सागर गणेश गायकवाड (वय-36 रा. पाबळ राजवाडा, ता. शिरुर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) आर्म अॅक्ट (Arms Act) व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश नबाजी हिंगे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथील भगत वस्ती येथील मोकळ्या मैदानात दोनजण आले असून त्यांच्याकडे पिस्टल सारखे हत्यार असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता दोघांकडे दोन पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे असा एकूण 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी अतुल तोत्रे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
त्याला जानेवारी 2023 रोजी पुणे पोलीस आयुक्तालय (Pune Police Commissionerate),
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातून (Pune Rural Area) दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. असे असताना कोणत्याही प्रकरारची परवानगी न घेता तो शहरात वावरताना आढळून आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे (PSI Bamane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्याच्या पैशावरून तरुणाचा खून, पुरंदर तालुक्यातील घटना

पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत केला बलात्कार; लष्करातील जवानावर FIR

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त

सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्‍या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक लाख रुपयांचा दंड