Pune Pimpri Crime News | दीडपट परतावा देण्याच्या बहाण्याने 48 लाखांची फसवणूक, हिंजवडी परिसरातील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | दिडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यवसायिकाची 48 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 20 मे 2023 रोजी बालेवाडी येथील हॉटेल रमाडा (Hotel Ramada Balewadi) येथे घडला आहे. याप्रकरणी सहा जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News )

संतोष ज्ञानेश्वर पिंजण (वय 45, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी 2 डिसेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला, रियान शेख उर्फ राकेश, सम्राट भाई उर्फ सौरभ दुबे, विनय मेहता, आशिक खान उर्फ बबलू भाई, सुनील यादव (रा. विश्रांतवाडी, पुणे) यांच्या विरोधात आयपीसी 420, 406, 465, 468, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी पिंजण यांना दिशाभूल करणारी माहिती दिली.
तर रियाण शेख उर्फ राकेश याने कंपनीचा माणूस असल्याचे सांगून कंपनीत गुंतवणूक केल्यास दीडपट परतावा मिळेल
असे पिंजण यांना आमिष दाखवले. पिंजण यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 49 लाख 50 हजार रुपये दिले. दरम्यान, गुंतवलेलेल्या रक्कमेपैकी एक लाख रुपये आरोपींनी पिंजण यांना आरटीजीएस द्वारे दिले. उर्वरित 48 लाख 50 हजार रुपये आणि परतावा न देता पिंजण आणि त्यांचा मित्र अफरफ महिरुद्दिन शेख यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे (PSI Kande) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार