Pune Pimpri Crime News | घरभाडे थकवून घर मालकीणीला बेदम मारहाण करत केला विनयभंग, मोशीमधील धक्कादायक घटना

Pune Pimpri Crime News | A shocking incident in Moshi where the owner of the house was brutally beaten and molested after paying the house rent
File Photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | भाड्याने दिलेल्या फ्लॅटचे घरभाडे (House Rent) थकवल्याने घराचा कब्जा घेण्यासाठी गेलेल्या घर मालकीणीला भाडेकरुंनी बेदम मारहाण (Beating) केली. तसेच महिलेसोबत अश्लील कृत्य करुन विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार मोशी येथील बोऱ्हाडेवाडी येथे घडला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.19) दुपारी पावणे (Pune Pimpri Crime News) दोनच्या सुमारास घडला.

 

याप्रकरणी ओमप्रकाश देवगडकर Omprakash Devgadkar (वय-50), महिला आरोपी (वय-45) यांच्यावर आयपीसी 420, 406, 354, 341, 447, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 50 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 70 वर्षीय सासू आणि नणंद या आरोपी रहात असलेल्या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपी महिलेने धक्काबुक्की करुन 50 हजार दिले तरच तुम्हाला घरात जाऊ देऊ असे म्हणत त्यांना विरोध केला.
त्यावेळी आरोपी ओमप्रकाश याने फिर्यादी यांच्या सासू आणि नणंदेला शिवीगाळ करुन नंणद हिच्या पोटात लाथ मारली.
तसेच त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
आरोपीने फिर्यादी यांचे सहा वर्षापासून सहा लाख रुपये घरभाडे थकवून आर्थिक फसवणूक (Fraud) केली आहे.
तसेच घरावर अतिक्रमण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Total
0
Shares
Related Posts