Pune Pimpri Crime News | ‘वस्तीत का आला’ म्हणत तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण, एकाला अटक; चाकण मधील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | तरुणाला घरासमोर बोलवुन घेत तु आमच्या वस्तीत का आला असे म्हणत लोखंडी पाईपने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील नाणेकरवाडी गावच्या हद्दीतील ज्योतिबानगर येथे सोमवारी (दि.27) रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) एकाला अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत तुकाराम नारायण किणे (वय-27 रा. गवते वस्ती, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून राजेश रामप्रसाद कोल (वय-30 रा. जोतिबानगर, नाणेकरवाडी) याच्यावर आयपीसी 326, 324, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्य़ादी याला घरासमोर बोलवुन घेत तु आमच्या वस्तीत का आला,
असे म्हणत अंगावर धावून जात कानाखाली मारली. तसेच शिवीगाळ करत घरासमोर पडलेला लोखंडी पाईपने
फिर्यादी यांच्या डाव्या पायावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच तु पुन्हा येथे दिसला तर तुला मारुन टाकीन अशी
धमकी देऊन निघून गेला. यानंतर फिर्यादी यांनी भाच्याला बोलावून घेतले.
त्याने फिर्य़ादी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बामणे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra MLA Disqualification Hearing | ३१ डिसेंबरपर्यंत आमदार आपत्रता निर्णय अशक्य, सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर मुदतवाढ मागणार?