Pune Pimpri Crime News | हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | दारु पिताना रागाने काय पाहतो असे हटकले असता तरुणावर दारुच्या बॉटलने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.26) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील पुष्कर वाईन्स समोरील मोकळ्या जागेतील पार्किंग मध्ये घडली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत शंकर बाबा पांडवे (वय-24 रा. पांढरकर वस्ती, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन घनश्याम माणिक शिवरकर Ghanshyam Manik Shivarkar (वय-49 रा. मु.पो. वाघदरा ता. खापरी मोरेश्वर जि. नागपुर सध्या रा. पुणे जिल्ह्यात कुठेही) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर व त्याचे मित्र पुष्कर वाईन्स समोरील मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये
दारु पित बसले होते. त्यावेळी आरोपी हा त्यांच्याकडे रागाने पाहत होता. त्यावेळी शंकर याने रागाने का पहातो असे विचारले.
यावर आरोपीने चिडून तिथे पडलेली दारुची बाटली हातात घेऊन शिवीगाळ केली. तसेच तुला संपतो असे म्हणून
जीवे मारण्याच्या उद्देशाने शंकर याच्या डोक्यावर, मानेवर, छातीवर दारूच्या बाटलीने सपासप वार केले.
यामध्ये शंकर पांडवे हा गंभीर जखमी झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके (PSI Vikas Shelke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”