Pune Pimpri Crime News | लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार; भोसरी परिसरातील घटना

0
910
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका विधवा (Widow) महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2023 या कालावधित घडला आहे.

 

याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) मंगळवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुर्गेशन गिरीराजपिल्लाई श्रीधर Murgeshan Girirajpillai Sridhar (वय-54 रा. मोशी) याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या विधवा असून एकट्या राहतात.
याचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्य़ादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नोव्हेंबर 2018 पासून शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान महिलेने एका मुलीला जन्म दिला. मात्र अद्याप आरोपीने महिलेसोबत लग्न केले नाही.
फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम (PSI Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण