Pune Pimpri Crime News | नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा, आरोपी गजाआड; वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | सायबेज कंपनीमध्ये (Cybage Company) संचालक असल्याचे सांगून तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष (Lure of Job) दाखवून त्यांच्याकडून महागडे मोबाईल, लॅपटॉप, टॅब घेऊन 5 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी 22 वर्षीय आरोपीला (Pune Pimpri Crime News) अटक केली आहे.

याबाबत एका तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) रविवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फरदीन फिरोज खान Fardeen Firoz Khan (वय-22 रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 14 डिसेंबर 2022 पासून सुरु होता. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फरदिन शेख याने फिर्यादी यांना सायबेज कंपनीत डायरेक्टर असल्याचे सांगून फिर्यादी व त्यांच्या इतर मित्रांचा विश्वास संपादन करून कंपनीत नोकरी लावते असे खोटे सांगितले.
तसेच फिर्यादी यांना बनावट मेल पाठवला. आरोपीने फिर्यादी व त्यांचे वर्गमित्र गौरव होवाळे व विनय भदरे
यांच्याकडून अ‍ॅपल कंपनीचे 2 लॅपटॉप, आयपॅड, सॅमसंग कंपनीचा फोल्ड मोबाईल, 2 आयफोन,
वन प्लस मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 5 लाख 63 हजार 448 रुपयांचे साहित्य व पैसे घेतले.

एक महिला झाला तरी नोकरी लावली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी रविवारी
तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप (PSI Jagtap) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime News | Accused extorts lakhs of money from youth by luring them with jobs; Incidents in Wakad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड