Pune Pimpri Crime News | काम करत असलेल्या कंपनीचा डेटा चोरून स्थापन केली दुसरी कंपनी, 48 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी FIR; चिंचवड MIDC मधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | काम करत असलेल्या कंपनीचा गोपनीय डाटा (Confidential Data), माहिती तसेच इतर महत्त्वाची माहिती चोरून दुसरी कंपनी स्थापन करुन 48 लाखांचा अपहार (Embezzlement) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चिंचवड एमआयडीसी (Chinchwad MIDC) मधील अ‍ॅडव्हेंट कंपनीत ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2022 या चार वर्षाच्या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) बुधवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश रमेश लिंबाचिया Akash Ramesh Limbachia (वय-31 रा. सिराको गार्डन, ताथवडे रोड, पुनावळे, ता. मुळशी) याच्यावर आयपीसी 420, 408, 418, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड एमआयडीसी मध्ये अ‍ॅडव्हेंट नावाची कंपनी (Advent Company) आहे. तर आरोपी आकाश फिर्य़ादी यांच्या कंपनीत कामाला होता. आरोपी आकाश याने कंपनीत काम करीत असताना त्याला कंपनीने दिलेल्या साधनांचा गैरवापर करुन कंपनीच्या कामकाजाचे स्वरुप जाणून घेतले. तसेच फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपीने कंपनीत काम करत असताना R&D Technologies या नावाची दुसरी कंपनी स्थापन केली.

आकाश लिंबाचिया याने अ‍ॅडव्हेट कंपनीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने कंपनीने बिझनेससाठी तयार केलेले डिझाईन,
कस्टमर इन्क्वायरी, स्टक्चर्स, कंपनी डाटा, प्रेस टुस्ल, कंपनीचा गोपनीय डाटा, माहिती तसेच कंपनी मधील स्पेशल
पर्पज मशिनचा गैरवापर केला. त्याने कंपनीची माहिती दुसऱ्या कंपनीला देऊन त्या कंपनीकडून प्रोडक्ट मटेरियल
(Product Material) तयार करुन घेतले. हे मटेरियल त्याने R&D Technologies या नावावर विकून आर्थिक गैरव्यवहार केला. तसेच अ‍ॅडव्हेंट कंपनीचा बिझनेस स्वत:च्या R&D Technologies या कंपनीकडे वळून साधारणपणे 48 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) करुन अपहार केला.

तसेच ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2022 या चार वर्षाच्या कालावधीत कंपनीत काम करत असताना त्याने 40 लाख 65
हजार 736 रुपये एवढा पगार देखील घेतला आहे. आरोपीने अ‍ॅडव्हेंट कंपनीचा विश्वास संपादन करुन फसवणूक,
आर्थिक गैरव्यवहार करुन अपहार केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग
(API Dattatraya Gulig) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना