Pune Pimpri Crime News | ‘जिलब्या गँगला जो कोणी नडणार, त्याची…’ दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | हातात कोयता (Koyta) घेऊन परिसरात दहशत पसरवणाऱ्या ‘कोयता भाई’च्या पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने हातात कोयता घेऊन तो हवेत फिरवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 26) रात्री नऊच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडला. (Pune Pimpri Crime News)

आशिष देविदास गोरखा Ashish Devidas Gorkha (वय-26 रा. बौद्ध विहाराच्या जवळ, महात्मा फुले नगर, चिंचवड)
असे अटक केलेल्या कोयता भाईचे नाव आहे. त्याच्यावर आयपीसी 506, 504 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश बाबासाहेब करपे (वय-35) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने त्याच्याजवळ विनापरवाना लोखंडी कोयता बाळगला.
मोहननगर येथील व्यावसायिकांना व लोकांना शिवीगाळ करुन धमकी दिली. तसेच ‘जिलब्या गँगला (Jilbya Gang)
जो कोणी नडणार, त्याची सुट्टी नाही’, असे मोठ्याने ओरडत त्याने हवेत कोयता फिरवला.
त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली. याची माहिती मिळताच पिंपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 200 रुपये किंमतीचा एक लोखंडी कोयता
जप्त केला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…

मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना

NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

Pune Crime News | भरधाव डंपर चालकाने रोड क्रॉस करणाऱ्या इसमास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू, गुन्ह्यातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता