Pune Pimpri Crime News | पिंपरी : प्रसाद पडला महागात, हात चलाखीने जेष्ठ नागरिकाची चेन लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | प्रसाद देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चेन हातचलाखीने लंपास केली. हा प्रकार मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ज्योतीबा मंदिराजवळ गुरुवार (दि.22) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Talegaon MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत नारायण मारुती चव्हाण (वय-58 रा. चव्हाणवाडा, इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादीला एका लहान प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बिस्कीटचे पुडे दिले.
तसेच बाराशे रुपये देवुन बिस्कीट पुडे व पैसे फिर्यादी यांना देवाला वाहण्यासाठी सांगितले.
तसेच प्रसादामध्ये फिर्यादी यांच्या गळ्यातील पन्नास हजार रुपायांची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ठेवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सोन्याची चेन प्रसादाच्या पिशवीत ठेवल्यावर आरोपींनी हातचलाखीने सोन्याची चेन लंपास करुन दुचाकीवरुन पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेळेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य ! छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार, 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन