Pune Pimpri Crime News | दुर्देवी! कार ओढ्यात पडून डॉक्टरचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | चांदखेड येथे ओढ्यात भरधाव कार कोसळून झालेल्या अपघातात (Accident News) कारमधील एका डॉक्टरचा मृत्यू (Death) झाला. हा अपघात रविवारी (दि.19) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास बेबड ओहोळ ते चांदखेड जाणाऱ्या रोडवर झाला. सत्यजीत अर्जुनराव नवाडे Satyajit Arjunrao Nawade (वय-42 रा. इशा फुडप्रिन्ट हौसिंग सोसायटी, ताथवडे, पुणे) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत पोलीस कर्मचारी नामदेव दासाप्पा दांडेकर (वय-57) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात (Shirgaon Parndavadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यजीत नवाडे यांच्यावर आयपीसी 279, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सत्यजीत नवाडे यांचे नेरे दत्तवाडी येथे माऊली हॉस्पिटल (Mauli Hospital Nere Dattawadi) आहे. ते रविवारी मध्यरात्री चांदखेड येथून ऑरा कारने (एमएच 14 जे.एक्स 1547) जात होते. डॉ. नवाडे हे रस्त्याच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात जात होते. त्यांची कार ओढ्याजवळ आली असता त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार ओढ्याच्या पुलाचे संरक्षणाचे लोखंडी पाईपला धडकून ओढ्यात पडली. ओढ्याच्या पाण्यात कार बुडाल्याने डॉ. नवाडे यांचा मृत्यू झाला. (Pune Pimpri Crime News)

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी शिरगाव परंदवडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
त्यानुसार पोलिसांचे पथक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा,
आपदा मित्र मावळ संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आली.
त्यावेळी कारमध्ये डॉ. नवाडे अडकल्याचे आढळून आले. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना