Pune Pimpri Crime News | 16 वर्षाच्या मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकलं, बापानं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

0
523
Pune Pimpri Crime News | father killed himself after thrown his son from 12th floor in pimpri chinchwad pune
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पुणे शहर आणि उपनगरामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आत्महत्यांच्या (Suicide) घटनांमध्ये वाढ होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलाला 12 व्या मजल्यावरुन खाली फेकून (Thrown Son From 12th Floor) देत वडीलांनीही उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे (Pune Pimpri Crime News) शहरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील पलाश सोसायटीमध्ये (Palash Society) ही खळबळजनक घटना घडली आहे. बापाने आपल्या 16 वर्षाच्या मुलाला इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून खाली फेकले. यानंतर स्वत: उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्यातील (Wakad Police Station) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेमुळे पलाश सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत तपास
सुरु केला आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बाप-लेक दोघेही मनोरुग्ण असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime News | father killed himself after thrown his son from 12th floor in pimpri chinchwad pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nanded Crime | सैराटची पुनरावृत्ती! नांदेडमध्ये प्रेमसंबंधामुळे कुटुंबीयांनीच केली पोटच्या लेकीची हत्या

Prakash Ambedkar | संजय राऊत यांच्या ‘त्या’ सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘हा सल्ला जर…’

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; नव्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल