Pune Pimpri Crime News | महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग, रोडरोमियोवर FIR; पिंपरी मधील घटना

0
280
Pune Pimpri Crime News | FIR on Rodromeo for stalking college girl and molesting her; incident in Pimpri
file photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | महाविद्यालयीन तरुणीला (College Girl) मोबाईवर फोन करुन तिचा पाठलाग करत तिला त्रास दिला. तसेच तरुणीला मीठी मारुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रोडरोमियो (Road Romeo) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) नोव्हेंबर 2022 पासून सुरु होता.याबाबत पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आकर्ष अजितकुमार मदनवार Akarsh Ajit Kumar Madanwar (वय-20 रा. भारत माता चौक, मोशी) याच्याविरुद्ध आयपीसी 354, 354(ड), 323, 506 (1) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाविद्यालयात शिकते. आरोपीने तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन मानसिक त्रास दिला. फिर्यादी या कॉलेजमध्ये जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करुन लग्नाची मागणी (Demand for Marriage) घातली. फिर्यादी यांनी याबाबत आई-वडिलांना सांगितले. त्यांनी त्याला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने याकडे दुर्लक्ष केले.

 

आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करुन मिठी मारुन गैरवर्तन केले.
तसेच माझा फोन नंबर ब्लॅकलिस्टमध्ये का टाकला अशी विचारणा करुन हाताने मारहाण (Beating) करुन
माझे ऐकले नाही तर कुटुंबाला जिवे मारून टाकण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
आकर्ष मदनवार याने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे
वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | FIR on Rodromeo for stalking college girl and molesting her; incident in Pimpri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR