Pune Pimpri Crime News | जमिनीचे खोटे बक्षीसपत्र तयार करुन व्यावसायिकाची फसवणूक, चाकणमधील प्रकार

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचे खोटे बक्षीसपत्र तयार करुन एका व्यवसायिकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 15 जून 2019 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील खराबवाडी गावच्या हद्दीत घडला असून दोघांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Pimpri Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

याप्रकरणी मनोहर मुनीराम नायडू (वय -63 रा.रामनगर हौसिंग सोसायटी, लांडेवाडी, भोसरी, पुणे ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अमृत श्याम केसवड Amrit Shyam Keswad (वय 39 रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे ) व त्याची पत्नी यांच्यावर आयपीसी 420, 465, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील खराबवाडी येथील जमिनीचा संबंधितांनी फिर्यादी नायडू यांच्याशी व्यवहार ठरवला. ही जमीन 92 लाख रुपयांची असून ती 82 लाख रुपयांना देत असल्याचे आरोपींनी सांगितले. यासाठी फिर्य़ादी यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. मात्र, ही जमीन बँकेकडे तारण असल्याची कोणतीही माहिती आरोपींनी फिर्यादी यांना दिली नाही. तसेच विक्रीचा व्यवहार सुरु असताना आरोपीने पत्नीच्या संमतीने आपल्या मुलाच्या नावे त्या जमिनीचे बनावट बक्षीसपत्र तयार करुन घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण (API Chavan) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक

Female Dead Body Found On Metro Site | धक्कादायक! मेट्रो साइटवर सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, खुनाचा संशय

शेतजमिनीच्या वादातून नातेवाईकांनी केली मारहाण, 10 जणांवर FIR; उरुळी कांचन मधील घटना