Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | ऑनलाइन बँकिंग व्यवहार करणाऱ्या खातेदारांचे बँक खाते हॅक करून ऑनलाइन फसवणूक (Cheating Fraud Case) करण्याचे प्रकार समोर येत आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. सायबर चोरट्याने (Cyber Thieves) एस.बी.आय. बँकेच्या औंध (SBI Bank) शाखेतील एका महिला खातेदाराच्या अकाऊंटमधून पाच लाख रुपयांची रोकड परस्पर काढून घतेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.28) दुपारी अडीच च्या सुमारास रहाटणी येथे महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने झाला. (Pune Pimpri Crime News)

याबाबत रहाटणी येथे राहणाऱ्या महिलेने बुधवारी (दि.29) वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुकर मिरधा (Shukar Mirdha) व बँक खाते धारकावर आयपीसी 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचे एस.बी.आय बँकेच्या औंध शाखेत खाते आहे. त्यांचे बँक खाते हॅक करुन आरोपीने परस्पर खात्यातून 5 लाख रुपये काढून घेतले. याबाबत माहिती मिळताच महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (PCPC Police) तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव (PSI Atul Jadhav) करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात