Pune Pimpri Crime News | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या चौघांना अटक, दोन पिस्टल 5 काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pimpri Chinchwad Crime Branch Unit 2) पथकाने चार जणांना अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टल (Pistol) आणि पाच जीवंत काडतुसे (Cartridges) असा एकूण एक लाख दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानाजवळ (PWD Ground Sangvi) गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी साडेचारच्या सुमारास केली. (Pune Pimpri Crime News)

हरीष काका भिंगारे (वय-34 धंदा टेम्पो चालक रा. औंध रोड, पुणे), गणेश बाळासाहेब कोतवाल (वय-30 टेम्पो चालक रा. समर्थनगर, नवी सांगवी), शुभम जगन्नाथ पोखरकर (वय-30 रा. पंचवटी, पाषाण), अरविंद अशोक कांबळे (वय-42 रा. मु.पो. पौड ता. मुळशी) यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत युनिट दोनेचे पोलीस नाईक आतिष शामराव कुडके यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानाजवळ काहीजण संशयितपणे थांबले असून
त्यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी मैदानाजवळ सापळा लाऊन चौघांना ताब्यात घेतले.
त्यांची अंगझडती घेतली असता भिंगारे व कोतवाल त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण
एक लाख दोन हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. तर पोखरकर व कांबळे यांनी बेकायदा पिस्टल
बाळगल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माने (PSI Mane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल