Pune Pimpri Crime News | पिंपरी ड्रग्ज प्रकरणात पोलिस अधिकार्‍याला अटक, आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता; प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौकात दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (MD) ड्रग्ज जप्त करण्यात आले (Drug Racket). याप्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) नमामी झा (Namami Za) याला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. आरोपीने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) कार्य़रत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव घेतले. त्यानंतर संबंधीत पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी करुन त्याला अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.(Pune Pimpri Crime News)

विकास शेळके (PSI Vikas Shelke) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विजय मोरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीकडे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचे नाव घेतले. त्यानंतर शेळके यांची कसून चौकशी करुन त्यांना अटक केली आहे.

सांगवी पोलिसांनी रक्षक चौकाच्या पुढे असलेल्या डी.पी. रोड पिंपळे निलख येथे आरोपी झा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचे 2 किलो 38 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी झा याच्याकडे आपल्या पद्धतीने चौकशी केली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचे नाव समोर आले असून या गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळला आहे. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. या ड्रग्ज प्रकरणात आणखी खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gangadham Fire News | मध्यरात्री गंगाधाम फेज दोनमध्ये भीषण आग ! अग्निशमन दलाकडून 5 जणांची सुटका तर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील केली कामगिरी

MLA Sanjay Gaikwad | शिंदे गटाच्या आमदाराने पोलिसाच्या काठीनेच युवकाला बदडले, शिवजयंती मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल