Pune Pimpri Crime News | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या तीन कारवाईमध्ये 7 पिस्टल व 9 जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने (Pimpri-Chinchwad Crime Branch) तीन कारवाया करत 7 पिस्टल (Pistol) व 9 जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. याप्रकरणी (Pune Pimpri Crime News) रविवारी (दि.29) सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे.

 

गुन्हे शाखा युनिट चारच्या (Crime Branch Unit 4) पथकाने दिघी पोलीस ठाण्याच्या (Dighi Police Station) हद्दीत चऱ्होली फाट्याजवळ शनिवारी (दि.28) रात्री अकरा वाजता कारवाई केली. या कारवाईत अक्षय रवी पाखरे (वय-22 रा. निकाळजे चाळ, म्हाळुंगे इंगळे, पुणे), प्रविण भारत म्हस्के (वय-20 रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांना अटक करुन त्यांच्याकडून 1 लाख 4 हजार हजारांच्या दोन देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. (Pune Pimpri Crime News)

दरोडा विरोधी पथकाने (Anti-Robbery Squad) आळंदी पोलीस ठाण्याच्या (Alandi Police Station)
हद्दीत शनिवारी (दि.28) रात्री अकराच्या सुमारास कारवाई करुन तिघांना अटक केली.
रामदास सुरेश सुकळे (वय-39 रा. तेली आळी, खेड), रियाज हुसेन शेख (वय-22 रा. मु.पो. पडाळी, ता. खेड),
तुषार उर्फ डेल्या शांताराम टेके (वय-24 रा. मु.पो. वडगाव काशिंबे, ता. आंबेगाव)
यांना अटक करुन 1 लाख 77 हजार 510 रुपये किंमतीचे 4 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त जप्त केली.

 

गुन्हे शाखा युनिट चारने दुसरी कारवाई वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station)
हद्दीतील शेख वस्ती येथे रविवारी (दि.29) पहाटे सव्वाचार वाजता केली.
तुषार महिपती मगर (वय-24 रा. शेडगे वस्ती, वाकड) याला अटक करुन 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल जप्त केले.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | seven pistols and nine live cartridges seized in three police operations so shackles to three people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)