Pune Pimpri Crime News | तडीपार गुन्हेगाराला पिस्टलसह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | दोन वर्षासाठी तडीपार (Tadipaar) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्टल (Pistol), मॅगझीन (Magazine) मोबाईल असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Pimpri Crime News) मंगळवारी (दि.31 जानेवारी) रात्री सातच्या सुमारास चक्रपाणी वसाहत (Chakrapani Vasahat Bhosari) येथे केली.

 

रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील Rupesh alias Santosh Suresh Patil (वय-31 रा. भोसरी गावठाण, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस नाईक विजय दीपक दौंडकर (Vijay Deepak Daundkar) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार (Criminal) आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 (DCP) यांनी आरोपीला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (Pimpri Chinchwad Police Commissionerate), पुणे पोलीस आयुक्तालय (Pune Police Commissionerate) आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी जुलै 2021 मध्ये तडीपार केले आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन आरोपी पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये फिरत होता. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला चक्रपाणी वसाहत येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपयाचे मॅगझिनसह पिस्टल आणि 20 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहाले (PSI Mohale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Tadipar criminal arrested with pistol by Pimpri Chinchwad Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण