Pune Pimpri Crime News | डुकरांसह टेम्पो लांबविला, चार जणांना अटक; महाळुंगे येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | लाकडी दांडके, लोखंडी टॉमीने मारहाण (Beating) करुन सहा जणांच्या टोळक्याने डुकरे भरलेला टेम्पो घेऊन पळून गेले. हा प्रकार गुरुवारी (दि.16) दुपारी चारच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Pimpri Police) सहा जणांवर गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत किशोर संपत साबळे (वय 39, रा. कानिफनाथ कॉलनी, ता.जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार महेंद्र रीडलान Rajkumar Mahendra Readlan (वय 31, रा. झेंडेमळा, देहूरोड), समाधान पांडुरंग राठोड Saadhan Pandurang Rathod (वय 32, रा. निघोजे, ता. खेड), राम मदन मोठे (वय 31, रा. खराबवाडी ता. खेड) आणि सोमनाथ अंकुश येळवंडे Somnath Ankush Yelwande (वय 41, रा. निघोजे, खेड) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या दोन साथीदारांविरोधात आयपीसी 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पिकअप गाडीत असलेले डुकरे मोकळे करण्यासाठी गाडी रोडवर उभी केली होती. ते डुकरांची पाहणी करत असताना स्पायसर चौकाकडून तीन दुचाकीवरुन सहा जण आले. त्यापैकी एकाने दुचाकी आडवी लावून फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने व लोखंडी टॉमीने पायावर मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल व डुकरे असलेला पिकअप (एमएच 20 ईएल 8579) गाडी जबरदस्तीने पळवून नेली.

आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 9 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Katrina Kaif Pregnancy News | लवकरच कतरिना-विकीच्या घरी होणार नव्या पाहुण्याचं आगमन, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसला BABY BUMP…!

Namrata Malla Viral Video | पारंपारिक लूकमध्ये नम्रता मल्लाने दाखवला हॉटनेसचा तडका, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Rubina Dilaik Baby Bump | हॉस्पिटलच्या बाहेर दिसली रुबीना दिलैक, पपराजीने BABY BUMP केला कॅमेरात कैद..!

Urfi Javed Topless Photoshoot | उर्फी जावेदनं केलं टॉपलेस फोटोशूट, शेअर केले शूटिंगचे BTS..