Pune Pimpri Crime News | जुन्या भांडणाच्या रागातून दुचाकी पेटवली, चाकण मधील प्रकार; एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | मोठ्याने शिव्या देण्याचा जाब विचारल्याने दुचाकी पेट्रोल ओतून जाळून टाकली. ही घटना बुधवारी (दि. 29) पहाटे चार वाजताच्या सुमारास चाकण मधील खंडोबा माळ येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत लता अरुण जाधव (वय-57 रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर रेहमत अन्सारी (रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर आयपीसी 435 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या घराजवळ राहतो. फिर्यादी यांचा मुलगा सुहास याने दीड महिन्यापूर्वी समीर अन्सारी याला मोठ्याने शिवीगाळ का करतो असा जाब विचारला होता. यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. फिर्यादी यांनी घराच्या समोरील शिवाजी ननावरे व रेहमत अन्सारी यांच्या बिल्डिंगच्या भिंतीजवळ त्यांची युनिकॉर्न दुचाकी (एमएच 14 डि.एस.1630) पार्क केली होती. आरोपी समीर अन्सारी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरुन बुधवारी पहाटे फिर्यादी यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवली. यामध्ये फिर्य़ादी यांची 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी जळून खाक झाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन समीर अन्सारी याला अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना

Pune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना