Pune Pimpri Crime News | दुसऱ्या तरुणासोबत का बोलतेस म्हणत महिलेचा विनयभंग, भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | दुसऱ्या तरुणासोबत का बोलतेस असे म्हणत एका महिलेला मारहाण केली. तसेच अश्लील बोलून तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार भोसरीत घडला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) मंगळवारी (दि.31 जानेवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास लांडेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Bhosari MIDC Police Station) फिर्याद दिली आहे. विकास साधू गाडेकर Vikas Sadhu Gadekar (वय-34 रा. लांडेवाडी, भोसरी) याच्यावर आयपीसी 354, 354(ब), 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना दुसऱ्या मुलांशी का बोलतेस असे म्हणत शिवीगाळ करुन हाताने मारहाण (Beating) केली.
त्यावेळी फिर्यादी यांचे आई-वडिल सोडवायला आले असता आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी सोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम (PSI Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Woman molested saying why are you talking with another young man, incident in Bhosari area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण