Pune Pimpri Crime | पिंपरी : बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांकडून अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलिसांनी बनावट चलनी नोटा (Fake Currency Notes) घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना अटक केली होती. तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यत घेतले होते. यानंतर आता देहूरोड पोलिसांनी किवळे येथून एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून 70 हजार रुपये किमतीच्या 140 बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.25) दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास किवळे येथील चहाच्या दुकानासमोर केली. (Pune Pimpri Crime)

ऋतिक चंद्रमणी खडसे (वय-22 रा. कंद पाटील नगर, विठ्ठलवाडी देहुगाव मुळ रा. मु.पो. मेंढा ता. मंगळुरपीर जि. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आयपीसी 489(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार किशोर विठ्ठल परदेशी (वय-36) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehurod Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खडसे हा 70 हजार रुपये किंमतीच्या बनावट प्रिंटींग असलेल्या 140 नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता. देहूरोड पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला किवळे परिसरातील मुकाई चौकातील एका चहाच्या दुकानासमोरुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 70 हजार रुपये किंमतीच्या 140 बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी नकली नोटा जप्त करुन त्याला अटक केली आहे. आरोपीने या नोटा कोठून व कोणाकडून आणल्या याचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

दरम्यान, आयटी पार्क हिंजवडीमधून माण गावात जाणाऱ्या रस्त्यावर बोडकेवाडी फाटा येथून तीन संशयितांना
हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून 500 रुपयांच्या एक लाख 20 रुपये किमतीच्या नकली चलनी
नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. पिंपरी चिंचवड परिसरात यापूर्वी बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
मात्र, हिंजवडी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच देहूरोड पोलिसांनी कारवाई करुन नकली नोटा जप्त
केल्याने खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Accident | पिंपरी चिंचवडमध्ये तीन अपघातांच्या घटना; तीन ठार

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू