Pune Pimpri Crime | पिंपरी : आठ लाखांच्या मालाचा अपहार, ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कंपनीचे पेनिट्रेटिंग ऑईल 60 चा माल ठरलेल्या ठिकाणी पोहोच न करता 8 लाखांच्या मालाचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जानेवारी 2024 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत मुंबई जेएनपीटी पोर्ट (Mumbai JNPT Port) ते खेड तालुक्यातील निघोजे (Nighoje Khed) या दरम्यान घडला आहे.(Pune Pimpri Crime)

याबाबत दिनेश मोहनलाल नावानी (वय-32 रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नवी मुंबई येथील अश्लेशा कंटेनर मुव्हर्स अॅन्ड लेबर कॉन्ट्रॅक्स चा मालक अक्षय आहेर याच्यावर आयपीसी 406, 408 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. फिर्यादी यांनी आरोपीच्या कंपनीला पेनिट्रेटिंग ऑईल 60 कंटेनर मध्ये लोड व सील करून मुंबई येथून फिर्यादी यांच्या दिप एन्टरप्रायजेस या तळेगाव दाभाडे येथील कंपनीत पोहचविण्यास सांगितले. मात्र आरोपीने माल योग्य ठिकाणी न पोहचवता अपहार करत फिर्यादीची 8 लाख 8 हजार 768 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन मुलांकडे चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी आणखी सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दुचाकी कुदळवाडी सर्कल ब्रीजच्या खाली असलेल्या स्पाईन रोड मधील मोकळ्याच जागेत लपुन ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सहा दुचाकी जप्त केला. आरोपींकडून चिखली पोलीस ठाण्यातील पाच तर डायघर पोलीस ठाणे, ठाणे शहर येथील एक असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार (Shivaji Pawar DCP), सहायक पोलीस आयुक्त संदीप हिरे (Sandeep Hire ACP) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, बाबा गर्जे, चेतन सावंत, भास्कर तारळकर, संदिप मासाळ, दीपक मोहिते, अमोल साकोरे, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड, संतोष सकपाळ, संतोष भोर, सातपुते यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Raid On Spa Center In Sangvi | सांगवी येथे स्पा सेंटरमध्ये चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका (Video)

Raj Thackeray On Vasant More | वसंत मोरेंबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे यांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया, म्हणाले… (Video)