Pune Pimpri Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे 9 कोटींची खंडणी मागणारा उच्चशिक्षित गुन्हे शाखेकडून गजाआड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | बांधकाम व्यावसायिकाकडे (Builder In Pune) नऊ कोटींची खंडणी (Ransom Case) मागून त्यातील दोन कोटींचा धनादेश स्विकारताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell Pimpri) एका ठगाच्या मुसक्या आवळल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर (PCMC Officer) आरोप करुन त्यांना धमकावल्या (Threat) प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हे (FIR) दाखल आहेत. आदिनाथ भुजाबली कुचनुर (Adinath Bhujabali Kuchanur) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Pimpri Crime) नाव आहे.

 

याबाबत बांधकाम व्यावसायिक केतुल भागचंद सोनिगरा Ketul Bhagchand Sonigra (वय – 41 रा. निगडी प्राधिकरण) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदिनाथ कुचनुर (रा. डांगे चौक) याच्याविरुद्ध IPC 385, 420, 465, 467, 468, 471, 475 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.27) डांगे चौकात सुरु असलेल्या सिग्नेचर पार्क साईटच्या (Signature Park Site) ऑफिसमधून अटक केली. त्याच्याकडून 2 कोटी रुपयांचा धनादेश व काही पिंपरी चिंचवड महानगर पालीकेच्या बांधकाम विभागाशी निगडीत कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रावरुन आरोपीने पिंपरी – चिंचवड, पुणे शहर व मुंबई (Mumbai) येथील काही बांधकाम व्यावसायिकांना धमकावल्याचे समोर आले आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डांगे चौक येथे सिग्नेचर पार्क नावाची बांधकाम साईट सुरु आहे. दरम्यान, आरोपीने त्यांना फोन करुन बांधकामात खूप त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिबुनलकडे (National Green Tribunal) खोटे अहवाल सादर करुन अडचणीत आणण्याची धमकी दिली. यासाठी त्याने बांधकाम साईटच्या एकूण किंमतीच्या 2.5 टक्के म्हणजे 9 कोटी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली.

 

फिर्यादी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये साध्या वेशात सापळा रचून आरोपीला खंडणीची रक्कम नेण्यास बोलावले. त्यावेळी फिर्यादी यांनी ठरलेल्या रकमेपैकी दोन कोटींचा धनादेश आरोपीला दिला. आरोपीने धनादेश हातात घेताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून ताब्यात घेतले.

आरोपी आदिनाथ कुचनुर याने यापूर्वी निवृत्त न्यायाधीश यांची (Retired Judge) खोटी कागदपत्रे बनवणे, बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणे, महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यावर खोटे आरोप करणे तसेच आर्किटेक्ट (Architect) यांना बदनाम करणे याप्रकरणी हिंजवडी (Hinjewadi Police Station), पिंपरी (Pimpri Police Station) व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपीने 2 वर्षे येरवडा कारागृहात (Yerawada Jail) शिक्षा भोगल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला शनिवारी (दि.28) मोरवाडी कोर्टात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

पोलिसांचे नागरिकांना आवाहन
प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मार्गाने खंडणी मागणारे व्यक्ती समाजात वावरत असतात, सोनिगरा यांनी ज्याप्रमाणे पोलिसांकडे तक्रार करुन आरोपीला गजाआड केले.
त्याचपद्धतीने जर कोणाला खंडणीची मागणी होत असेल किंवा केली असेल तर त्या व्यक्तीने पुढे येऊन नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी.
तसेच काही अडचण असल्यास थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (CP Ankush Shinde),
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanvat)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने (API Harish Mane),
पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, श्याम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके,
तौसिफ शेख यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Pune Pimpri Chinchwad Police Crime Branch Arrest Adinath Bhujabali Kuchanur in Ransom Extortion Case Of Builder

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा