Pune Pimpri Crime | जांभळाची अख्खी पाटी विकत घेण्याचा बहाणा करुन ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | जांभळाची अख्खी पाटी विकत घेण्याचा बहाणा एका चोरट्याने (Thieves) वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र नजर चुकवून लांबविले. याबाबत मावळ तालुक्याती वडोर (Pune Pimpri Crime) येथील राहणार्‍या एका 60 वर्षाच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या जांभुळ विक्रीचा व्यवसाय करतात. पाटीत जांभळे घेऊन त्या चिंचवडजवळील मोहननगर परिसरात पायी फिरत होत्या. यावेळी त्या शितल हॉटेलसमोर बसल्या होत्या. त्यावेळी एक जण त्यांच्याजवळ आला. त्याने जांभळाची पूर्ण पाटी कितीला देणार असे विचारले. त्यावर त्यांनी ठोक विक्री करायची नसल्याचे सांगितले. तेव्हा तो 1 हजार रुपये देतो, असे बोलला. त्यावर फिर्यादी यांनी दीड हजार रुपये मागितले. तो तयार झाला. पाटी घेऊन घरी चला असे म्हणाला. (Pune Pimpri Crime)

 

त्या पाटी घेऊन सोबत जात असताना जिजामाता सांस्कृतिक भवन ते रामनगरला जोडणार्‍या कच्च्या रस्त्यावर त्याने तुमच्या गळ्यातील पोत काढून ठेवा,
नाही तर कोणी चोरी करुन घेऊन जाईल असे सांगितले. त्यांनी गळ्यातील पोत काढून त्याच्या सोबत काही अंतर चालत गेले.
तेव्हा त्याने फिर्यादी यांना पाटी खाली ठेवण्यास सांगितली. मी येथे रहात असून पत्नीला आवाज देतो, असे सांगून त्याने शबनम म्हणून दोन वेळा आवाज दिला.
तेव्हा त्यांनी पाटी खाली ठेवत असताना त्यांनी पाटीत ठेवलेली मंगळसुत्र, ठेवलेली प्लस्टिकची पिशवी त्याने नजर चुकवून चोरली. तेथून निघून गेला.
त्या बराच वेळ वाट पहात थांबल्या. तरी तो परत न आल्याने पाटीत पाहिल.
तेव्हा त्यांची साडेसात ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपयांचे मंगळसुत्र ठेवलेली पिशवी पाटीत नव्हती. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Pune Pimpri Crime News Today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel 365 Days Plan | एक वर्षाच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त प्लान, मिळतील अनलिमिटेड कॉल्स, जाणून घ्या किंमत

 

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

 

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून पॉझिटिव्ह, लागोपाठ वाढत आहे इथेरियमचा डॉमिनन्स