Pune Pimpri Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेला लघवी पाजण्याचा प्रयत्न; 4 महिलांसह 8 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने लघवी (Urine) पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) चार महिलांसह 8 जणांवर IPC 354, 324, 342, 143, 147, 148, 148, 323, 504 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

 

याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) सुसगाव (Susgaon) येथे घडला आहे. संबंधित महिलेने शनिवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Pune Pimpri Crime)

 

महिलेच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या भावकीतील व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्यानंतर संबंधित महिला सासऱ्या सोबत जाब विचरण्यासाठी गेली होती (Pune News). आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब तिने विचारला. त्यावेळी आरोपींनी महिला आणि तिच्या सासऱ्यांना लाथाबुक्क्या, चपला आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर आरोपींनी बाटलीत लघवी गोळा करुन आपल्याला पाजण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी महिलेला आणि सासऱ्यांना खोलीत डांबून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार 15 मे रोजी सूसगाव या ठिकाणी घडला होता. घडलेल्या प्रकारामुळे महिला आणि तिचे सासरे तणावात होते.
या धक्क्यातून सावरत महिलेने 21 मे रोजी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलीस ठाण्यात चार महिलांसाठी आठ जणांवर विनयभंग (Molestation Case ) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे (API Ganesh Kharge) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | pune woman alleges that she has been forced to drink urine fir registered at Hinjewadi Police Station of pimpri chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

 

Monkeypox रशियाचे Bioweapon आहे का? काय आहे हे आणि असे होऊ शकते का?

 

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा