Pune Pimpri Crime | प्रेमात खर्चलेल्या पैशांची मागणी करत तरुणीवर बलात्कार; भोसरी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | घरात एकटी असलेल्या 19 वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर प्रेमात खर्च केलेले पैसे मागत लग्न केले नाही, तर भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) भोसरी परिसरात पीडित मुलीच्या घरात घडला असून, पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

बालाजी कल्याण शेडापे (रा. लांडेवाडी, भोसरी, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 19 वर्षांच्या पीडित मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी घरामध्ये एकट्या असताना आरोपी घरी आला. त्याने ‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असे बोलून शरीर संबंधाची मागणी केली.
फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास आरोपी पुन्हा घरी आला.
त्याने फिर्यादी यांना माझ्याशी लग्न कर नाहीतर आजपर्यंत तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केले आहेत ते परत कर, असे म्हणत फिर्यादी यांच्या सोबत वाद घातले.

फिर्यादी यांनी आरोपीला शिक्षण झाल्यावर लग्न करू असे सांगितले.
याचा राग आल्याने आरोपीने तरुणीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
तसेच तू जर माझ्याशी लग्न केले नाहीतर तुला व तुझ्या भावाला मारून टाकेन,
अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Rape of young woman demanding money spent in love; Incidents in Bhosari area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narendra Patil | ‘शरद पवारांना जाणता राजा पदवी द्यायला ते कुठे लढायला गेले होते?’ मंगलप्रभात लोढा वक्तव्याप्रकरणी नरेंद्र पाटलांचा सवाल

INDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर