Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधाची माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन विवाहितेवर बलात्कार, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | प्रेमसंबंधाची (Love Affair) माहिती पतीला सांगण्याची धमकी देऊन विवाहिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार जुलै 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत पिंपरी-चिंचवड परिसरात घडला आहे.

याबाबत 25 वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) रविवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मंगेश आनंदराव बोराटे Mangesh Anandrao Borate (वय-26 रा. सातारा) याच्याविरुद्ध IPC 376, 376 (2) (एन), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश याची फिर्यादी महिलेसोबत ओळख झाली.
ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने प्रेमसंबंधाची माहिती पतीला सांगण्याची धमकी महिलेला दिली.
तसेच महिलेला पिंपरी चिंचवड परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक
संबंध प्रस्थापित केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक (PSI Mulik) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Rape on married woman by threatening to tell the information of love affair to her husband, incident in Pimpri-Chinchwad area