Pune Pimpri Crime | सासरा-जावयाची भांडण सोडवणं मध्यस्थाला पडलं महागात, रॉडने बेदम मारहाण

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सासरा जावयाची भांडण सोडवणं एकाला चांगलेच महागात पडले आहे. दोघांमधील वाद सोडवत असताना तिन जणांनी मध्यस्थी करणाऱ्यालाच बेदम मारहाण (Beating) करत डोक्यात लोखंडी रॉड (Iron Rod) मारुन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील भांबोली येथे शुक्रवारी (दि. 19) दुपारी साडेतीनच्या सुमारास (Pune Pimpri Crime) घडली आहे.

 

याप्रकरणी ओमजित बाबाजी पडवळ Omjit Babaji Padwal (वय – 20 रा. शेलु पडवळ वस्ती, खेड)
यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी ऋषी जगताप, बबन जगताप, नितीन जगताप (सर्व रा. वासुली फाटा, ता. खेड) यांच्यावर आयपीसी 326, 504, 34 अन्वये गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र तेजश लिंबोरे, योगेश घावटे हे दुचाकीवरुन अल्फा टेक इंजीनियरिंग कंपनीत (Alpha Tech Engineering Company) गेले होते.
त्यावेळी फिर्यादी यांचा मित्र तेजश लिंबोरे याच्या ओळखीचा मित्र सिक्युरिटी गार्ड कांबळे व त्यांचा जावई यांच्या मुलीच्या नांदवण्यावरुन वाद सुरु होते.
त्यावेळी फिर्यादी हे त्यांना समजावून सांगण्यास गेले असता आरोपी ऋषी आणि इतर आरोपी त्या ठिकाणी आले.
त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तर ऋषी जगताप याने त्याच्याकडे असलेला लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात उजव्या बाजूला मारला.
यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण (API Sarang Chavan) करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | Resolving the dispute between father in law and son in law cost the mediator brutally beaten by the rod

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा