Pune Pimpri Crime | सोन्याचे दागिने घडविणाऱ्या कारागिराने पळविले सतरा तोळे सोने; पिंपरी-चिंचवड मधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) तयार करुन देण्यासाठी विश्वासाने कारागिराकडे दिलेल्या दोन सोन्याच्या लडींचा अपहार केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कारागिरावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सराफ व्यावसायिकाची 7 लाख 87 हजार 500 रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 6 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पिंपरी गावातील जयलक्ष्मी ज्वेलर्स (Jayalakshmi Jewellery) येथे घडला.

 

याप्रकरणी आरोपी रॉनी ताजुद्दीन शेख Rony Tajuddin Shaikh (रा. काळेवाडी, पुणे मुळ. रा. वेस्ट बंगाल-West Bengal) याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) आयपीसी (IPC) 406 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत हितेश रमेश दोशी Hitesh Ramesh Doshi (वय-45 रा. आदर्श नगर, काळेवाडी, पुणे मुळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांना फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी कारागिर रॉनी शेख याला ऑर्डर प्रमाणे गंठण,
अंगठ्या, चैन, झुमके तयार करुन देण्यासाठी 175 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन लगडी दिल्या होत्या.
मात्र आरोपीने सोन्याचे दागिने तयार करुन न देता फिर्यादी यांनी दिलेल्या सोन्याच्या लडी घेऊन पसार झाला.
पुढील तपास पोलीस उप निरीक्षक डोळस (PSI Dolas) करत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Seventeen talents of gold were stolen by the goldsmith; Incidents in Pimpri-Chinchwad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई