Pune Pimpri Crime | 43 वर्षीय महिलेवर 65 वर्षाच्या ज्येष्ठाकडून लैंगिक अत्याचार; देहूरोड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | वधु-वर सुचक मंडळ चालवणाऱ्या महिलेसोबत ओळख वाढवून तिच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) 2018 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत देहूरोड परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 65 वर्षाच्या व्यक्तीवर देहूरोड पोलीस ठाण्यात आयपीसी 376 (2) (एन) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 43 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे देहूरोड परिसरात 10 ते 15 दुकानाचे गाळे आहेत.
यापैकी एक दुकान भाड्याने घेऊन पीडित महिलेने वधु-वर सुचक मंडळ सुरु केले आहे. आरोपी त्याठिकाणी येऊन बसत होता. यातून त्यांची ओळख झाली. गप्पा मारत असता आरोपीने पीडित महिलेला आय़ुष्यभर सांभाळ्याचे व मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. तसेच आयुष्यभर सांभाळण्याचे आमिष दिले ते पूर्ण केले नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक गावडे करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Sexual abuse of woman by luring child into employment; Incidents in Dehur Road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का?’; रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांच्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Uday Samant | ठाकरे गटाची चिंता वाढणार? उदय सामंतांचा मोठा दावा, म्हणाले – ‘गुवाहाटीवरून परत येताना आमच्यासोबत’

Chandrakant Patil On Maharashtra Karnataka Border Issue | सीमावादावरील गावांसाठी 2 दिवसांत मोठी घोषणा – चंद्रकांत पाटील