Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन लैंगिक अत्याचार, चाकणमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | वीस वर्षाच्या तरुणीसोबत मैत्री करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गरोदर (Pregnant) राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणी गरोदर राहिल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणावर चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) खराबवाडी गावच्या हद्दीत एप्रिल 2022 मध्ये घडला आहे.

कोमल कांत Komal Kant (रा. खाराबवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीवर चाकण (म्हाळुंगे) पोलीस ठाण्यात (Chakan (Mahalunge) Police Station) आयपीसी 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत 20 वर्षाच्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने एप्रिल 2022 मध्ये रात्री आठच्या सुमारास संबंधित तरुणीस फोन केला
आणि आपण कुठेतरी फिरायला जाऊ असे सांगत बोलावून घेतले. त्यानंतर ती आल्यावर चाकण तळेगाव
मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या (Indian Oil Petrol Pump) मागे असणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी शेतात नेऊन तरुणीच्या इच्छेविरोधात तिच्यावर बलात्कार केला. तरुणी आठ महिन्याची गरोदर राहिल्याने तिने तरुणाला फोन करुन लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने लग्न करण्यास नकार देऊन मोबाइल बंद ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय जाधव (PSI Dattatraya Jadhav) करत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | Sexual assault by friendship with a 20-year-old girl, incident in Chakan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sachin Vaze | सचिन वाझेंना जामीन मंजूर; पण, …

Swatantryaveer Savarkar | सावरकरांच्या जन्मगावी राहुल गांधींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; संपूर्ण गावाने पाळला कडकडीत बंद

Modi Government | ‘या’ कायद्यामुळे नाही चोरता येणार चीनला तुमचा डेटा; मोदी सरकार लवकरच मांडणार नवीन विधेयक