Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार, चाकण परिसरातील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे 2022 रोजी चाकण येथे (Pune Pimpri Crime) घडला आहे.

याबाबत 26 वर्षीय तरुणीने चाकण पोलिसांकडे सोमवारी (दि.14) तक्रार केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सतिश सुधाकर मुंडणकर Satish Sudhakar Mundankar (रा. म्हाळुगे, ता. मुळशी) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
आरोपीने फिर्यादी यांना भेटायला बोलावून घेतले. फिर्यादीकडे शरीर संबंधाची मागणी केली असता तरुणीने
विरोध केला. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद
केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर (PSI Shendkar) करीत आहेत.

Web Title :-  Pune Pimpri Crime | Sexual assault on a young woman by luring her into marriage, an incident in Chakan area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update