Pune Pimpri Crime | ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत’ असे म्हणत दहीहंडीची वर्गणी कमी दिल्याच्या रागातून दुकान मालकाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दहीहंडी (Dahi Handi) उत्सवासाठी वर्गणी (Contribution) देण्यावरुन झालेल्या वादानंतर स्नॅक्स सेंटरवर (Snacks Center) हल्ला करुन लुटल्याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) 10 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन 4 जणांना अटक (Arrest) केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड (Pune Pimpri Crime) मधील रहाटणी (Rahatani) येथील जयभवानी चौकातील राज स्नॅक्स सेंटर येथे मंगळवारी (दि. 9) रात्री आठच्या सुमारास घडली.

 

याबाबत राहुल अरविंद गुप्ता Rahul Arvind Gupta (वय – 27 रा. रहाटणी लिंक रोड, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रसाद राऊत Prasad Raut (वय – 25), मनेश उर्फ मन्या कदम Manesh alias Manya Kadam (वय – 18), माऊली उपल्ले Mauli Upalle (वय – 21), यश रसाळ Yash Rasal (वय – 20) यांना अटक केली आहे. तर रोहित शिंदे उर्फ बॉन्ड (Rohit Shinde alias Bond), सुनील शेट्टी (Sunil Shetty), विजय तलवार (Vijay Talwar) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या स्नॅक्स सेंटरमध्ये आले. त्यांनी फिर्यादी यांचे भाऊ विवेक यांच्याकडे दहीहंडीची वर्गणी मागितली व हातातील वर्गणीचे पुस्तक विवेक यांच्याकडे दिले. विवेक यानी 100 रुपये दिले. परंतु त्यांनी विवेकच्या कानशीलात लगावत 500 रुपयांची मागणी केली. यावेळी विवेकने दोनशे रुपये देऊ केले. सुनिल शेट्टी व विजय तलवारे यांना राग आल्याने त्यांनी विवेकला हाताने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादी हे त्यांना समजावून सांगत असताना सुनील शेट्टी, माऊली उपल्ले, विजय तलवारे, यश रसाळ, रोहीत शिंदे, मनेश कदम,
प्रसाद राऊत व त्यांच्या सोबत असलेल्या इतर तिघे दुकानात घुसले त्यांनी फिर्यादी यांचा भाऊ विवेक यांना हाताने मारहाण केली.
तसेच दुकानातील स्नॅक्स काऊंटर खाली पाडले व स्वीट काऊंटरच्या काचा फोडून शेट्टी आणि तलवारे यांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
शेट्टी याने तिथेच पडलेली लोखंडी कडई फिर्यादी यांच्या डोक्यात मारुन जखमी केले.

 

सुनील शेट्टी आणि विजय तलवारे यांनी फिर्यादी यांना ‘तुम्हाला माहित नाही काय, आम्ही या एरियाचे भाई आहोत’ असे म्हणत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या आईला तलवारे व शेट्टी याने ढकलून देत वडिलांनाही मारहाण केली.
आरोपींनी खाली पडलेल्या स्नॅक्स काऊंटरच्या गल्यातील 10 ते 12 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
तसेच पुढील महिन्यापासून दर महिन्याला हप्ता (Extortion) चालू करायचा अन्यथा आई-वडिलांना मारुन टाकू अशी धमकी देऊन,
दुकानासमोर आरडाओरडा करुन परिसरात दहशत निर्माण केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (API Dabhade) करीत आहेत.

 

 

Web Title : – Pune Pimpri Crime | snacks center vandalized due to low subscription for dahi handi festival in Rahatani

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा