Pune Pimpri Crime | कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत महिलेचा केला विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लहानपणी गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीने महिलेचा फोन नंबर मिळवून तिला फोन केला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी औरंगाबाद येथील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मागील दीड महिन्यापासून सुरू होता. (Pune Pimpri Crime)

 

याबाबत 42 वर्षांच्या महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश गंगाधर जाधव (वय – 43 रा. सुभश्री कॉलनी, सिडको एन-5, औरंगाबाद) याच्यावर आयपीसी 354 (ड), 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी लहानपणी औरंगाबाद येथे राहत असताना आरोपी त्यांच्या गल्लीत राहत होता. दीड महिन्यापूर्वी आरोपीने फेसबुकवरून फिर्यादी यांचा फोन नंबर मिळवला. त्यानंतर त्याने महिलेला फोन करून माझ्याशी बोल, मला तुला भेटायचे आहे म्हणून वारंवार फोनवरून त्रास दिला. दरम्यान, फिर्यादी यांनी त्याचा फोन घेतला नाही. आरोपीने फिर्यादी यांचा मुलांच्या शाळेपर्यंत पाठलाग केला. तसेच भेटण्यास बोलावून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून मानसिक त्रास दिला. फिर्यादी यांनी याकडे दुर्लक्ष केले असता आरोपीने फिर्य़ादी यांची औरंगाबाद येथे राहणारी आई, मुलांना व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | The woman was molested by threatening to kill the family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss Marathi | बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना ‘या’ स्पर्धकाने घातला घरात वाद; आता काय घडणार घरात?

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर