×
Homeक्राईम स्टोरीPune Pimpri Crime | महिलेला पैशांचा मोह पडला महागात! 200 कोटींच्या कर्जासाठी...

Pune Pimpri Crime | महिलेला पैशांचा मोह पडला महागात! 200 कोटींच्या कर्जासाठी गमावले 79 लाख; हिंजवडीमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सौर उर्जेवरील प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असे सांगून एका महिलेची 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) जानेवारी 2020 ते आजपर्यंत हिंजवडी फेज -2 मारुंजी येथे महिलेच्या घरी व पुण्यात घडला आहे.

 

विद्याधर काशीनाथ जोशी (रा. 6-डी पार्थ इन्क्लेव्ह कॅनल रोड, कर्वेनगर, पुणे), परेश शहा (रा. एस.व्ही रोड बोरीवली (पश्चिम), मुंबई) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर उर्जेवरील प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. आरोपींनी महिलेला विश्वासात घेऊन 2 लाखात 5 कोटी याप्रमाणे 200 कोटी रुपयांच्या कर्जासाठी 79 लाख रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. आरोपींवर विश्वास ठेवून महिलेने पैसे जमा केले. त्यानंतर कर्ज न देता 79 लाख रुपये परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | The woman was tempted by money expensive! 79 lakhs lost for a loan of 200 crores; Incident in Hinjewadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी, सराईत गुन्हेगार राकेश मारणेवर FIR

Jitendra Awhad On Ramdev Baba | ‘रामदेव बाबांच्या मनात आणि नजरेत विकृती भरलीय’ – जितेंद्र आव्हाड

Washim ACB Trap | शिवभोजन थाळीची थकीत रक्कम मिळण्यासाठी मागितली लाच; पुरवठा विभागाचा निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Must Read
Related News