Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या दागिन्यांच्या बॅगेवर चोरट्यांचा डल्ला; 27 लाखांचा मुद्देमाल लंपास, बालेवाडी येथील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | लग्नासाठी आणलेल्या सोने आणि डायमंडच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. तब्बल 27 लाख 60 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) म्हाळुंगे बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड (The Orchid Hotel) येथे मंगळवारी (दि.6) दुपारी सव्वाचार ते रात्री साडेदहाच्या दरम्यान घडली.

 

याबाबत विक्रमकुमार बाबूलाल भोजाणी Vikram Kumar Babulal Bhojani (वय 47, रा. माऊन्ट जॉय रोड, बंगळुरू) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 380 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या भाच्याच्या लग्नासाठी आले होते.
त्यांनी लग्नासाठी 17 लाख 50 हजार रुपये किमतीचे 650 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किमतीचे डायमंड हेअरिंग,
9 लाख रुपये रोख, मोबाइल, आधार कार्ड असा एकूण 27 लाख 60 हजार
रुपयांचा ऐवज एका काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवला होता.
अज्ञात चोरट्यांनी ती बॅग लंपास केली. रात्री साडेदहाच्या सुमारास दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याचे फिर्य़ादी यांच्या लक्षात आले.
त्यांनी तात्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोमारे (API Gomare) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Thieves pounce on a bag of jewelry brought to a wedding; 27 lakh worth of goods incident Balewadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Petrol-Diesel Prices | ‘केंद्र सरकार दर 15 दिवसांनी कच्च्या तेलांच्या किमतीचा घेणार आढावा’ – निर्मला सीतारामन

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी