Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने मैत्रिणीचा गळा आवळून खून; चाकण-नाणेकरवाडी येथील घटना

0
144
Pune Pimpri Crime | to avenge the insult the friend murdered her friend chakan nanekarwadi pimpri chinchwad pune crime news
File Photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | मैत्रिणीच्या आईने अपमान केल्याने आलेल्या रागातून मित्राने मैत्रिणीचा गळा आवळून खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना (Pune Pimpri Crime) घडली आहे. ही घटना चाकण-नाणेकरवाडी (Chakan-Nanekarwadi) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. प्रीती कुमारी संतोष साह Preeti Kumari Santosh Sah (वय 18, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे.

 

या प्रकरणी विष्णुकुमार विनोद साह Vishnukumar Vinod Sah (वय 20) याला चाकण पोलिसांकडून अटक करण्यात आले. या प्रकरणी तरुणीच्या आईने चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली.

 

याबाबत माहिती अशी की, प्रीतीकुमारी ही चाकण एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होती.
तर, आरोपी विष्णुकुमार हा सुद्धा एका कंपनीत कामाला आहे. प्रीती कुमारी आणि विष्णुकुमार यांच्यात मैत्री होती.
इतकेच नाही, तर प्रीतीकुमारीच्या आईची आणि विष्णुकुमारचीही ओळख होती. प्रीतीकुमारीच्या आईने विष्णुकुमार याचा अपमान केला होता. याचा राग त्याला होता.

दरम्यान, याच रागातून विष्णुकुमारने रविवारी सकाळी 10 च्या सुमारास प्रीतीकुमारीचा गळा आवळून खून केला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा चाकण पोलिस तपास (Chakan Police) करत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | to avenge the insult the friend murdered her friend chakan nanekarwadi pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा