Pune Pimpri Crime | वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या बलुचिस्तान मधील तरुणाला अटक; सांगवी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सांगवी पोलिसांकडून करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान एका परदेशी तरुणाने पोलिसांसोबत हुज्जत घालून धक्काबुक्की केली. याप्रकरणी तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) शनिवारी (दि.28) सकाळी अकराच्या सुमारास औंधकडून सांगवी (Aundh-Sangvi) फाट्याकडे जाणाऱ्या रोडवर घडला.

 

शहा वली बोर अली अकबर अब्दुल रहमान Shah Wali Bor Ali Akbar Abdul Rehman (वय-26 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी, मुळ रा. सिस्तान, बलुचीस्तान, देश इराण (Balochistan, Iran) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सांगवी वाहतूक शाखेचे (Sangvi Traffic Branch) सहायक पोलीस फौजदार रविंद्र बाळकृष्ण महाडीक Ravindra Balkrishna Mahadeek (वय-55) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी 353, 323, विदेशी व्यक्ती कायदा (Foreign Persons Act), मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Crime)

 

सांगवी वाहतूक विभागाकडून शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी त्याच्या दुचाकीवरुन (एमएच 12 ई.यु. 9332) सांगवी फाट्याकडे जात होता. पोलिसांची नाकाबंदी पाहून त्याने दुचाकी अचानक थांबवून रोडच्या विरुद्ध दिशेने गाडी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच 12 ई.क्यु 2066) आरोपीच्या गाडीची धडक बसली. पुलाजवळ काहीतरी धडकल्याचा आवाज आल्याने पोलीस त्या दिशेने गेले.

दोन दुचाकींची धडक झाल्याने आरोपी आणि दुसऱ्या गाडीवरील महिला रस्त्यावर पडल्याने फिर्यादी व त्यांचे सहकारी त्यांच्या मदतीसाठी गेले.
पोलीस आरोपीकडे चौकशी करत असताना त्याने फिर्यादी यांचे सहकारी अनंत यादव व संतोष सपकाळ यांना धक्काबुक्की केली.
फिर्यादी सोडवण्यासाठी गेले असता त्यांना हाताने जोरात मारहाण करुन रस्त्यावर ढकलले. यामध्ये फिर्यादी किरकोळ जखमी झाले आहेत.

 

आरोपीकडे गाडी चालवण्याचा परवाना (License) मागितला असता त्याने परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी त्याचे पासपोर्ट (Passport) व व्हिसाची (Visa) मागणी केली.
पोलिसांनी व्हिसा तपासला असता 17 ऑक्टोबर 2022 मध्ये त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याचे निदर्शनास आले.
मुदत संपल्यानंतर तो विनापरवानगी भारतात वास्तव्य करत होता. आरोपी पिंपरी येथील डी.वाय.पाटील येथे बी.फार्मसीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
अपघात झाला त्यावेळी त्याने मादक पदार्थाचे सेवन केल्याचे आढळून आले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Traffic police shocked, youth from Balochistan arrested for living illegally in India; Incidents in Sangvi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mahesh Landge | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून आमदार महेश लांडगेंची सर्वपक्षीयांना भावनिक साद; म्हणाले…

Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…

Amar Mulchandani ED Raid | कट रचून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह 6 जणांविरुद्ध ईडीकडून स्वतंत्र FIR