Pune Pimpri Crime | रस्त्यावर पट्टे मारणाऱ्या 5 कामगारांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू 4 गंभीर जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai Highway) पांढरे पट्टे मारत (Road Strip) असताना एका भरधाव ट्रकने पाच कामगारांना धडक (Hit by Truck) दिली. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू (Death) झाला तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. साजिद खान Sajid Khan (वय-25) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत (Ravet) येथे पहाटेच्या सुमारास झाला.

अपघातामध्ये संदीप कुमार (Sandeep Kumar), प्रल्हाद यादव (Pralhad Yadav), भोला कुमार (Bhola Kumar), अनिल कुमार (Anil Kumar) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, कामगार पहाटेच्या सुमारास रावेत येथे काम करत होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने भारधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पाच कामगारांना धडक दिली.

यामध्ये साजिद खान हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार कामगारांच्या अंगावर उकळता रंग उडाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

Web Title : Pune Pimpri Crime | Truck Accident four workers injured one dead on pune-mumbai highway near ravet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त