Pune Pimpri Crime | हिंजवडीत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या 6 जणांवर FIR, 2 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | हिंजवडी येथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसाय (Prostitution) करण्यास भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) सहा जणांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन दोन जणांना अटक (Arrest) केली आहे. शुभम राजेंद्र ढेरे Shubham Rajendra Dhere (वय-28) आणि योगेंद्र बाळु कुंभार Yogendra Balu Kumbhar (वय-27) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची (Pune Pimpri Crime) नावे आहेत.

हा प्रकार आनंदनगर, लक्ष्मी चौकाजळ हिंजवडी येथील हॉटेल आर. के. एक्सक्लुजीव लॉज (Hotel R. K. Exclusive) येथे बुधवारी (दि.18) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी एका 43 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम ढेरे (वय-28 रा. हिंजवडी मूळ रा. नेकनुर ता.जि. बीड-Beed), मॅनेजर योगेंद्र कुंभार (वय-27 रा. हिंजवडी) सुनिल मदार Sunil Madar / राहुल Rahul/जिजु Jiju (पूर्ण नाव माहित नाही), संजित अमरनाथ सिंग Sanjit Amarnath Singh (वय-38 रा. गुरुद्वारा चौक, आकुर्डी) आणि दोन महिलांवर आयपीसी 370(3), अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील हॉटेल आर.के. एक्सक्लुजीव, लॉज येथे आरोपींनी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. महिलांना लॉजमध्ये अडकवून ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिविका भागवत होते. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Pune Pimpri Crime | two arrested for forcing prostitution in hinjewadi pimpri chinchwad pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त